आमचे धोत्रे गुरुजी (भाग १)
Submitted by मिरिंडा on 31 October, 2023 - 02:25
--------- स्टॅंडवर एसटी उभी होती. ऐन उन्हाची वेळ. मी गेली पंधरा मिनिटे आत बसून होतो. अडीचची एसटी पावणेतीन झाले तरी सुटत नव्हती. गावातल्या घराची विकटीक करून मी मुंबईला निघालो होतो. आई-वडील गेल्यापासून घर रिकामं पडलं होतं. गावात घर भाड्याने देऊन फारसं भाडं येणार नसल्याने मी ते रमणिकशेटला विकून आलो होतो. थोडंफार गलबलल्यासारखं झालंच होतं.नाही म्हटलं तरी ग्रॅज्युएशन पर्यंत मी तिथे दिवस काढले होते. गावाचा अखेरचा निरोप मी एकट्यानेच घेतला. माझी बायको दिशाला मी सोबत घेतलंच नव्हतं.
शब्दखुणा: