लेखन उपक्रम २ - सरप्राइज - हरचंद पालव
Submitted by हरचंद पालव on 23 September, 2023 - 06:26
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
आणि तो वैतागला.
"अगं ती फुलांची पिशवी हातात घेऊन काय करते आहेस?"
ती काही बोलणार इतक्यात त्याने ती फुलं परातीत ओतून चुरून टाकली. तेवढ्यात एक डोळा दरवाज्याकडे ठेवत ती स्टूल घेऊन आली. तो परात वर धरून उभा राहिला. तिनं पाकळ्या पंख्याच्या पात्यांवर पसरून टाकल्या. विजेच्या वेगाने पुढील हालचाली करत उतरून स्टूल जागेवर ठेवलं, दिवे मालवले आणि बाकीच्या लोकांप्रमाणे सोफ्यामागे जाऊन लपून बसली.
शब्दखुणा: