मायक्रोजॉनरचा अभ्यास

डाकू हसीना

Submitted by पायस on 29 July, 2023 - 12:31

१२ फेब्रुवारी १९८३ हा चंबळ खोर्‍याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी फूलन देवीने आत्मसमर्पण केले आणि बॉलिवूडपर्यंत बँडिट क्वीनची कीर्ति खर्‍या अर्थाने पोहोचली. तसे बघावे तर बॉलिवूडला लेडी डाकूपटांची ओळख फूलनचे दुधाचे दातही पडले नव्हते त्या काळापासून होती (पुतलीबाई, १९७२). फूलनच्या स्टोरीने त्यांना एक फॅक्टरी प्रॉड्युसिबल टेम्प्लेट मिळवून दिले. त्यानंतर पुढची कैक वर्षे लेडी डाकू हा फॅशनेबल रोल बनला. हा असा रेअर कमर्शिअल रोल होता ज्यात हिरोईनची मुख्य भूमिका असे ना की हिरोची.

विषय: 
Subscribe to RSS - मायक्रोजॉनरचा अभ्यास