#कविता #शंतता

रानातली शांतता

Submitted by VD on 16 July, 2023 - 02:30

एकटा मी,
एकटा पाऊस,
चंद्रही एकटाच.
अन, सोबतीला,
ती ही दूर रानातली एकांत शांतता ।

ना चंद्र भिजलेला,
ना शब्द चंद्राळलेले,
ना थेंबांना शब्दात गुंफले.
तरी एक आंतरिक दुवा,
ती ही दूर रानातली एकांत शांतता ।

अंधारात कुठे खळखळते एक जलधारा,
थरथरते रान सारे, प्राशून थंड वारा.
काळोख किती हृदयी ह्या रानच्या !
स्फुरले त्यास काही
ती ही दूर रानातली एकांत शांतता ।

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #कविता  #शंतता