Submitted by VD on 16 July, 2023 - 02:30
एकटा मी,
एकटा पाऊस,
चंद्रही एकटाच.
अन, सोबतीला,
ती ही दूर रानातली एकांत शांतता ।
ना चंद्र भिजलेला,
ना शब्द चंद्राळलेले,
ना थेंबांना शब्दात गुंफले.
तरी एक आंतरिक दुवा,
ती ही दूर रानातली एकांत शांतता ।
अंधारात कुठे खळखळते एक जलधारा,
थरथरते रान सारे, प्राशून थंड वारा.
काळोख किती हृदयी ह्या रानच्या !
स्फुरले त्यास काही
ती ही दूर रानातली एकांत शांतता ।
त्या अभाळच्या चंदेरी उंबरठ्यावर,
अजून किती रेंगळशील रे मना !
सांग वाद चंद्राशी काय झाला असा,
की निष्कर्ष आली,
ती ही दूर रानातली एकांत शांतता ।
-VD
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंधारात कुठे खळखळते एक जलधारा
अंधारात कुठे खळखळते एक जलधारा,
थरथरते रान सारे, प्राशून थंड वारा.
काळोख किती हृदयी ह्या रानच्या !
स्फुरले त्यास काही
ती ही दूर रानातली एकांत शांतता ।
वा मस्तच...
धन्यवाद ..
धन्यवाद ..
शिर्षकात टायपो आहे. शातंता
शिर्षकात टायपो आहे. शातंता हवय तिथे शंतता झालंय.
कविता वाचली आणि शांतता
कविता वाचली आणि शांतता अनुभवास आली.
निदर्शनास आणून दिल्याबद्दल
निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद @दत्तात्रय साळुंके.
धन्यवाद @केशवकूल.