प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - बागेश्री
स्पर्धेचा मी निवडलेला विषय- लग्न : खोलीपासून ते बोहल्यापर्यंतचा प्रवास!
--------------------------------------------------------------
".....दिदे, सरळ उभी रहाय की गं, कित्ती हलायलीस, आणि साडी पण असली घेतली आहेस ना ही, एक पण मिरी उघडून पुन्हा घडी जर घातली ना, तर त्या घड्या पडलेल्या दिसतात, अन् तू हलतीस ना इतकी, कश्या पाडू सांग, मी एकसारख्या मिर्या??"
अनघा 'नांदेडी' ठसक्यात फणकारलीच...
"अगं अनु, मग तो मोबाईल दे ना, बघु नवर्याचा मेसेज आलाय का ते?"