मराठी भाषा गौरव दिन - लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - प्राचीन - उंबरठा
Submitted by प्राचीन on 27 February, 2023 - 00:10
उंबरठा
कृष्णधवल स्वरूपात हा चित्रपट मी पहिल्यांदा ल्हानपणी पाहिला, तो सह्याद्री वर शनिवार / रविवार मराठी चित्रपट दाखवत असत, त्या काळात. अर्थातच काही समजला नव्हता, पण तेव्हा माझ्या आईचा एक उद्गार मात्र लक्षात राहिला, "बाईनं घराचा उंबरठा ओलांडला, की घरात पुन्हा प्रवेश नसतो." याचाही अर्थ तेव्हा समजला नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी ऊनपावसाच्या क्षणांच्या गाठीभेटी झाल्या, तेव्हा चित्रपट पुन्हा पाहिल्यावर त्यातले संदर्भ काहीसे उमगले. पूर्णपणे समजले असा दावा करणं शक्य नाही.
विषय: