अफ्रिकेतील अतर्क्य

अफ्रिकेतील अतर्क्य - भाग ५

Submitted by रुद्रसेन on 6 August, 2022 - 03:10

कुकुच कु ... कोंबड्याची बांग ऐकू आली तसा मी शुद्धीवर आलो. शुद्धीत आल्यावर समजलं, कि मी माझा गेस्टहाउस वर बेडवर पडलेलो होतो. माझा हाताला मलमपट्टी केलेली होती. सकाळ झाल्यासारखं वाटत होतं. खिडक्यांच्या फटीमधून हलकासा सकाळचा सुर्योदयापुर्वीचा प्रकाश येत होता. कसलातरी जळका वास बाजूच्या खोलीमध्ये पसरला होता आणि माझा नाकात शिरला, मी बेडवर उठून बसण्याचा प्रयत्न करू लागलो, आणि मला शिंकायला आलं. माझा शिंकण्याचा आवाजाने बाहेर च्या खोलीत बसलेला अॅलन पळतच आत माझाकडे आला.

“ मित्रा बऱ वाटतय का तुला” काळजीनेच माझा जवळ येत अॅलन ने मला विचारलं.

विषय: 

आफ्रिकेतील अतर्क्य - भाग ४

Submitted by रुद्रसेन on 5 August, 2022 - 01:36

( प्रस्तुत कथा हि सत्य कथा नसुन केवळ मनोरंजन म्हणून लिहिण्यात आलेली आहे . लेखनशैलीमुळे मायबोलीवरील नवीन लोकांना ती सत्य कथा असल्याप्रमाणे वाटू शकते. पण वाचकांचे निखळ मनोरंजन करणे हाच कथेचा उद्देश आहे. )

विषय: 

आफ्रिकेतील अतर्क्य - भाग ३

Submitted by रुद्रसेन on 4 August, 2022 - 08:56

आम्ही शिळे मागे जाऊन उभे राहिलो. आमच्या समोर थोड्या अंतरावर तो मांत्रिक आणि घरमालकाची निपचित पडलेली मुलगी दिसत होती. मांत्रिक आता शांतपणे गुडघ्यावर बसून होता. त्याचा बाजूच्या शेकोटीचा विस्तव मंद होत होता. अचानक एक मोठी डरकाळी आम्हाला ऐकू आली ती एवढी मोठी होती कि माझा अंगाचा थरकापच उडाला, घरमालक पण भ्यायला पण बोलला काही नाही, जंगलामधून ती डरकाळी आलेली होती. त्या डरकाळी नंतर जंगलामध्ये एक विचित्र शांतता पसरली आमच्या आजूबाजूला देखील ती जाणवली इतकी कि मला माझा श्वासाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. एखादा वाघ किंवा अजून कोणता हिंस्र प्राणी आला तर काय होईल या विचाराने खरंतर माझा कापरं भरलं.

विषय: 
Subscribe to RSS - अफ्रिकेतील अतर्क्य