कझाखस्तानमधील अशांतता
Submitted by पराग१२२६३ on 14 January, 2022 - 12:46
कझाख सरकार सरकारने 1 जानेवारी 2022 पासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द केल्यावर त्याचे दर जवळजवळ दुपटीने वाढले. त्याविरोधात जनतेने सुरू केलेल्या शांततापूर्ण निदर्शनांना अचानक हिंस्र स्वरुप आले आणि त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरण्याची भिती निर्माण झाली. अलमातीच्या विमानतळावरही त्या हिंसक निदर्शकांनी अल्प काळासाठी ताबा मिळवला होता. या हिंसाचारात 18 पोलिस आणि 164 सामान्य नागरिकांचे प्राण गेले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कझाख राष्ट्रपती कासिम-जोमार्त तकायेव (Kassym-Jomart Tokayev) यांनी पंतप्रधानांना पदावरून हटवले आणि सरकार तातडीने बरखास्त केले.