सी-130

अफगाणिस्तानातून सुरक्षित सुटका

Submitted by पराग१२२६३ on 4 September, 2021 - 03:18

तालिबान आणि अमेरिका यांच्यातील सत्ता हस्तांतरासंबंधीच्या करारानुसार अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि ‘नोटो’चे सैन्य 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मायदेशी परतले. सैन्यमाघारी आणि सत्ता हस्तांतराची ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अफगाणिस्तानात अतिशय अनिश्चित आणि अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली. अनेक देशांनी अफगाणिस्तानातील आपापले राजदुतावास बंद केले आणि आपापल्या नागरिकांबरोबरच अमेरिका आणि मित्रदेशांच्या सैन्याला मदत करणारे खबरे यांनाही सुरक्षितपणे अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यास त्या देशांनी सुरुवात केली.

Subscribe to RSS - सी-130