१. सुवर्ण संधी
Submitted by Ratnakaryenji on 8 January, 2021 - 01:59
जेव्हा मी लार्सन अॅण्ड टुब्रोत पहिले वर्ष मढ आयलण्ड येथे ड्रिलिंग इक्विपमेंट्स मध्ये एक वर्ष शिकाऊ म्हणुन प्रवेश केला मला सर्व काही नवीन होते. मजा म्हणजे मड आयलण्ड हे नावच मुळात ऐकले नव्हते. सुरवातीलाच पवईला मुलाखत,निवड व कागदपत्रे सादर करण्याचे सोपस्कार झाल्यावर वाटले की पवईच्या मोठ्या कँम्पस मध्ये कुठेतरी खपुन जाऊ . आमची पंचवीस मुलांची निवड झाली होती.तो काळ असा होता की लार्सन अॅण्ड टुब्रो व तिथे मेकॅनिकल ड्राफ्टमन हे तुम्ही सांगितले की लोकांना तुमच्या चेहर्यामागे एक सुंदर चकचकीत वलय फिरते असा भास व्हायचा. कारणच तसे होते. मुंबईत फारच कमी खाजगी कंपन्या होत्या .
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: