पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी
Submitted by तृप्ती आवटी on 31 August, 2020 - 18:21
मी मागे एकदा लेमनांसाठी भाकरीची पाककृती लिहिली होती. भाकरीचं पीठ मळण्यासाठी एस आकाराचं ब्लेड लावून फुड-प्रोसेसर वापरायचा. एकदम छान, भेगा न पडता भाकरी होतात. उकड मळण्यासाठी हीच पद्धत वापरून मोदक पण छान होतात. उकड मळण्याइतकंच कौशल्याचं काम आहे एकसारख्या कळ्या घेऊन मोदक वळणं. आमच्या घरी मोदक म्हटलं की तळणीचेच. नारळाचा ताजा चव घालून केलेले तळणीचे मोदक फार छान लागतात. उकडीच्या मोदकांशी ओळख झाली ती एका मैत्रिणीच्या घरी. एकदा खाल्ल्यावर तेच जास्त आवडू लागले. सुरूवातीला अनेक वर्ष गौरी-गणपतींसाठी घरी जाणं व्हायचं तेव्हा दोन्ही घरी दोन्ही प्रकारचे मोदक मिळायचे.
विषय:
शब्दखुणा: