ताई (भाग ३रा )
Submitted by मिरिंडा on 29 June, 2020 - 09:23
दीपाचा चेहरा मला पाहून फुलला होता. " अगं, लवकर तयार हो. आपल्याला निघायचंय ना .....? " मी इच्छा नसतानाही म्हणालो. मला तर तिनी उशीर केला आणि जाण्याचं रद्द झालं तर बरं होईल असं वाटत होतं. त्यावर पप्पाही म्हणाले, " दीपा जरा लवकर तयार हो बेटा. एव्हाना आपण निघायला पाहिजे होतं... " ते पुढे काही म्हणणार तेवढ्यात दीपा त्यांच्या जवळ जाऊन त्याना कवटाळीत म्हणाली," हे काय हो पप्पा, तीन साडेतीनला तर मी आल्ये. नाही गेलं तर नाही का चालणार...." आता मात्र पप्पा माघार घेत म्हणाले, " तुला काय म्हणायचंय ना ते ताईला सांग. उगाच दोघी मला मधे घेऊ नका.,,," असं म्हणून ते जागचे उठले आणि आत गेले.
शब्दखुणा: