शरीरातला भ्रष्टाचार आणि तब्येतीवरचा अत्याचार
Submitted by उडन खटोला on 2 June, 2020 - 00:57
आपण काही खाल्लं तरी शरीराला 'ए.टि.पी.' म्हणजेच 'अडिनोसिन ट्राय फॉस्पेट' हे ऊर्जेच्या स्वरूपात लागते. 'एटीपी' याला आपल्या शरीराची "एनर्जी करंसी" असे संबोधले गेले आहे. ह्याला मी 'खरी कमाई' म्हणतो अथवा "व्हाईट मनी". वाचत रहा तुमच्या लक्षात येईल कि घामाचा पैसा म्हणजे काय. तुम्ही काही खा, शरीराचा प्रयत्न असतो कि त्याला 'ग्लुकोज'च्या पातळीवर आणून रक्तात मिसळुन देणे, व त्यापासून 'एटिपी' तयार करणे. गहू, ज्वारी, भाकरी, तांदुळ, भात काही खाल्लं जिच्यामध्ये 'स्टार्च' आहे त्याचा 'ग्लुकोज' होणारच. सोबत प्रथिने (प्रोटिन्स) महत्वाचे म्हणून कडधान्य, पालेभाज्या सोबत खाव्या लागतात .