उरले

काय उरले

Submitted by पारिजातका on 6 May, 2020 - 14:34

तुझ्या माझ्यात काय उरले
'मी' पणा सोडून सारेच विरले
माझेच खरे करता करता
आपलेपण कधीच हरले

घेतल्या होत्या ज्या आणाभाका
शब्द ते मंत्रातच दडले
सप्तपदीच्या पावलांचे
रक्तबंबाळ ठसेच उरले

सोबतीचे क्षण आपुले
आठवणीत एकाकी पडले
दुरावलेले मन हे आता
मार्ग वेगळा शोधून गेले

हरवले नाते साताजन्मचे
बंध प्रेमाचे तुटून गेले
अहंपणाच्या अहंकाराने
शापित जीवन मात्र उरले

- प्राजक्ता

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उरले