मी.
Submitted by अजय चव्हाण on 26 April, 2020 - 06:30
कृष्णविवारातला काळा बिंब मी..
अथांग अवकाशी अदृश्य टिंब मी..
माझ्या माझ्यातच मी गुंतलेलो
स्वप्रतिमेत हलका चिंब मी..
उदास काळ्या रात्री, निश्चल मी.
थांग ना मनाचा, असह्य मी..
पसारा हा मोठा,त्यात रिक्त मी.
भल्या विचारांत, आरक्त मी..
न सुचलेल्या कवितेचा शब्द मी...
न उमगलेल्या भावनांचा अर्थ मी...
लपलेल्या मनाचा स्वार्थ मी..
आभासी ह्या जगाचा व्यर्थ मी...
- अजय चव्हाण.
विषय: