बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा
Submitted by Dr Raju Kasambe on 4 February, 2020 - 01:19
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा
हजारो अग्निपंखांचे थवे गुलाबी
खाडीत कांदळवनाच्या उतरती
लावे वेध मिलनाचे, चाहूल मृगाची
ठेका धरतो ‘फ्लॅश मॉब’ नृत्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !
लिपस्टिक आयशाडो
मिनिस्कर्ट स्टॉकिंग्ज
तयारी गुलाबी गुलाबी
करून मेकअप पूर्ण पार्टीचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !
कॅटवॉक गुलाबी सुंदरींचा
नटून, खेटून चाले तुरुतुरु
जणू परेड नृत्यांगणांची
आभास नुसता खाण्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !