का धुंद मनात बासरी वाजे..
Submitted by Happyanand on 19 January, 2020 - 13:58
गर्दीत हरवून ही
का मनास रिते रिते वाटे
हसु चेहऱ्यावरी तरी
का डोळ्यात पाणी साचे..
ऐकता नाव कधी तिचे
का धुंद मनात बासरी वाजे....
सुप्त झाल्या आठवणी साऱ्या
तरी का मनास बोचे काटे
ना चारोळीत दिसे ती आता
ना कवितेत ती साजे..
ऐकता नाव कधी तिचे
का धुंद मनात बासरी वाजे....
पापण्या मिटता आता ही
का तिचाच चेहरा दिसे
गुंतते नजर नजरेत अजुन ही
जरी तुटले मैत्रीचे धागे..
ऐकता नाव कधी तिचे
का धुंद मनात बासरी वाजे....
मी लिहलेल्या प्रत्येक शब्दांना
तिच्या ओठांचा स्पर्श असे
विषय: