देवा जाग्यावर...१
Submitted by हरिहर. on 6 November, 2019 - 02:46
रात्रीचे दिड वाजले असावेत. अंगणात मुहुर्तमेढ रोवलेली होती. लहानसा मांडव बांधलेला होता. शेजारीच मनगटाएवढ्या जाडजुड उसांनी ऐसपैस चौक बांधला होता. अनेक प्रकारची फुले, फळे, नागवेलीची पाने, सुपारी यांनी चौक रंगीबेरंगी दिसत होता. समोर देवीचे, खंडोबाचे टाक वगैरे होते. तेथेच हातभर उंचीची दिवटी आणि पितळी बुधला होता. त्या दिवटीचा आणि जमीनीत खोचलेल्या मशालींचा उजेड चौकावर पडल्याने तो मोहक दिसत असला तरी भितीदायकही दिसत होता. अंगणात एक-दोन पिवळ्या प्रकाशाचे प्रखर दिवे लावलेले होते त्यांचा काही प्रकाश जागरण-गोंधळ जेथे सुरु होता तेथवर पोहचत होता.
विषय:
शब्दखुणा: