नो बॅरीअर्स

सोळ्या आण्याच्या गोष्टी - नो बॅरीअर्स - अजय चव्हाण

Submitted by अजय चव्हाण on 7 September, 2019 - 13:44

बाजूच्या घरातून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तसं मी हळूच दार उघडलं. बाजूचा दरवाजा उघडाच होता.
मी आत डोकवलं. कुसुमच्या सासूबाई रडत होत्या आणि जमिनीवर कुसुमच प्रेत पडलेलं. लोक गोळा होत होती. सांत्वन करत होती.
प्रकाश तर काही बोलण्याच्याच मनस्थितीत नव्हता.

कसा असणार? गेल्या महिन्यात "ही" गेली तेव्हा माझीसुद्धा हीच परिस्थिती होती. मी हलकेच प्रकाशच्या खांद्यावर थोपटलं. त्याचा बांध फुटला. तो मला बिलगून रडू लागला. मी फक्त थोपटत राहीलो.

अशावेळी काय करावं, काय बोलावं काहीच सुचत नाही.

मी सांत्वन करून निघून आलो..

विषय: 
Subscribe to RSS - नो बॅरीअर्स