चंद्रयान २
Submitted by मी मधुरा on 7 September, 2019 - 02:09
तुटला आहे संपर्क;
जिद्द नाही अजून.....
एव्हड्या तेव्हड्या गोष्टीने
जाणार नाही खचून!
सहभागी प्रत्येक यशात
मग आज कुठे वेगळे?
प्रयोगातून नवीन शिकू
एकत्र मिळून सगळे
मंगळ असो, चंद्र असो,
हिंमत ठेवा शाबूत
प्रयत्नांती तुमच्या
विश्वही येईल काबूत
©मधुरा
विषय: