काव्य काव्य काय ती एक कागदावर लेखणी
Submitted by तो मी नव्हेच on 8 August, 2020 - 23:27
माझे असे हे दैव की शब्दांसवे मी खेळतो
तो मेळही बसतो जिथे गणितास नाही बैसतो
मज कदाचित भ्रम असे शब्दांसवे मी खेळलो
ते खेळती माझ्या मनाशी मी उगाचच ऐटतो
हे शब्द शब्दा लागता काहूर ही उठते मनी
अन् मी ही वेडा काहूरास काव्य म्हणूनी नाचतो
काव्य काव्य काय ती एक कागदावर लेखणी
वाचता त्यालाच फिरूनी मी मलाच भेटतो
काय हो जादू तरी की कागदी हा आरसा
वाचणारा ही स्वतःला त्यातही मग शोधतो
हे शब्द अन् हा आरसा सारीच त्याची देणगी
तो तिथे स्मितहास्य लेऊन सारीपाट खेळतो
-रोहन
विषय: