देशोदेशीच्या चवी : भाग १ : सिंगापोर - लक्सा
Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 19 August, 2019 - 06:10
सिंगापोर म्हणजे खवैय्यांची पंढरी. भारतीय, चिनी आणि मलाय खाद्यसंस्कृती इथे गुणगोविंदाने नांदतात. त्यांची स्वतःची स्वभाववैशिष्ट्ये तर आहेतच पण त्यांच्या एकमेकांशी झालेल्या संगमातून काही नव्या आणि चविष्ट खाद्यपदार्थांनीही जन्म घेतला आहे.