ग्रीष्म फुलला (हायकू)

ग्रीष्म फुलला (हायकू)

Submitted by Dr Raju Kasambe on 2 August, 2019 - 09:54

ग्रीष्म फुलला (हायकू)

भगवी वस्त्रे
साधू रानात उभा
पळस फुले

हळद ल्याले
सोनझुंबर डूले
बहावा फुले

त्यागून पाने
लाल शालू नेसले
शाल्मली फुले

मधमाशांचे
मधासाठी गुंजन
आंबेमोहोर

लदबदले
वड पिंपळ चारं
फळफळून

रान मेव्याची
जंगलात आरास
ग्रीष्म फळला

मध चाखाया
पक्ष्यांचा कलरव
ग्रीष्म फुलला

डॉ. राजू कसंबे
(दि. १४ एप्रिल २०१९)

Subscribe to RSS - ग्रीष्म फुलला (हायकू)