कावळा आणि अंधश्रद्धा
Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 00:46
कावळा आणि अंधश्रद्धा
काळ्या काळ्या कावळ्याच्या, अकलेला तोडच न्हाय
काळा काळा दिसतो अन, करतोया काव
कावळ्याशी पंगा कधी, घेऊच न्हाय
हैराण करील चोच मारून, सोडणार न्हाय
गाणी गातो कावळीसाठी, खाऊन जातो भाव
उन्हाळ्यात बांधतो घरटे, खरकटं खाय
कोकिळा बनविते उल्लू, त्याला कळतच न्हाय
घरट्यात टाकून अंडी त्याच्या, भुर्र उडून जाय
कोकिळेच्या पिल्ल्याला, भरवत र्हाय
अकलेच्या गोष्टी मोठ्या, सांगतच र्हाय
मडक्यात टाकून खडे, पाणी पीतो काय
अजूनतरी कुणी तसं, पाह्यलंच न्हाय
शब्दखुणा: