आवडलं असतं मला..
तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत जगायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला
आवडलं असतं..
जर मीच असते तुझ्या हृदयात
कलेकलेने वाढणारं प्रेमसुद्धा
आणि दुराव्यातला विरहसुद्धा..
आवडलं असतं..
जर दोन्हीचं कारण मीच असते
आणि तसं तू म्हणाला असतास
असंख्य नक्षत्र ताऱ्यांना विसरुन..
मलाच शोधत हरवला असतास
तर आवडलं असतं मला.. हरवायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला
ध्रुवतारा
पेटतो हा ग्रीष्म वणवा
अंतरी आठवणींचा ठेवा
ना पाझरती आता अश्रू
ना बरसतो श्रावण नवा
ना फुलतो कधी वसंत
ना उमटती मनीचे बोल
डोहातील गर्तेपेक्षा आहे
तुझी आठवण खोल
होताच तुझी आठवण
होते माझी सांज सकाळ
ना उमगती मज दिशा
ना उमगते काळ वेळ
ढळले जरी चन्द्रसूर्य
ढळल्या जरी शत तारा
हृदयीच्या नभांगणात अढळ
तुझ्या आठवणीचा ध्रुवतारा
राजेंद्र देवी
ध्रुवतारा
पेटतो हा ग्रीष्म वणवा
अंतरी आठवणींचा ठेवा
ना पाझरती आता अश्रू
ना बरसतो श्रावण नवा
ना फुलतो कधी वसंत
ना उमटती मनीचे बोल
डोहातील गर्तेपेक्षा आहे
तुझी आठवण खोल
होताच तुझी आठवण
होते माझी सांज सकाळ
ना उमगती मज दिशा
ना उमगते काळ वेळ
ढळले जरी चन्द्रसूर्य
ढळल्या जरी शत तारा
हृदयीच्या नभांगणात अढळ
तुझ्या आठवणीचा ध्रुवतारा
राजेंद्र देवी