गझल)

गझल

Submitted by कीर्ती देशकर on 13 February, 2019 - 14:50

झाली आज माझ्या जखमांची मोजणी
आकडा चुकीचा वाटतोय वजनात घोळ आहे

वेदनांचा आता नको पसारा उगाच
एकूण घेण्यास दुःख कुणास वेळ आहे

कळ्यांनो उमलू नका एवढ्यात
मिठीत मी त्याच्या पहाट होण्यास वेळ आहे

मुली माझ्या फुलां परी नाजूक
शिक्षण मी त्यांना काट्यांच्या कुंपणात देत आहे

छोटी शब्दरचना होती रस्त्यात पडली
हात धरुन म्हणाली चल आई शोधायची आहे

Subscribe to RSS - गझल)