तरुण मुलांना हे सगळं रिलेट होणं कठीण आहे पण आमच्या लहानपणी आम्ही काय खेळत होतो, शून्य साहित्यातून ही आम्ही खेळाचा आनंद कसा घेत होतो त्याची ही गोष्ट. तुमचे ही असे काही स्पेशल खेळ आणि आठवणी असतील तर ते ही इथे लिहा.
आमचे अनोखे खेळ
लंगडी
सुखाचे डोंगर
दुःखाचा सागर
ओलांडता ओलांडता
झालो मी बेजार
लटपटता हा देह
ना मिळे त्यास उभार
बास झाला संसार
देवा आता आवर
रोज नवे राज्य
कळे ना भोज्या
घालतो लंगडी
पळती सारे दूरवर
राजेंद्र देवी