मेंदी

मेंदीच्या गोष्टी

Submitted by Arnika on 27 May, 2018 - 15:07

मी तिसरीत असताना मामाच्या लग्नात पहिल्यांदा मेंदीचा कोन हातात घेतला. तो सुऱ्यासारखा धरून घरभर फिरले माझ्या पहिल्या गिऱ्हाइकाच्या शोधात. मी जवळ गेले की सगळ्या बायका एकतर करंज्या तळायला लागायच्या किंवा केरसुणी घेऊन केर काढायच्या. त्यांना हातावर कोयऱ्यांची नक्षी हवी होती आणि माझ्या मनात कितीही असलं तरी मला फक्त कुरडयाच काढता येत होत्या. शेवटी मला नाराज करायला नको म्हणून मामाने त्याच्या हातावर मला मेंदी काढू दिली.

विषय: 
शब्दखुणा: 

मेंदीचा दरवळ - एक सुंदर अनुभव

Submitted by धनश्री on 9 December, 2012 - 14:22

मेंदी - लहानपणापासूनच लागलेलं एक वेड. सोलापूरला असताना लहानपणी फक्त नागपंचमीला मेंदीच्या झाडाची पानं तोडून वाटून तिचा लगदा करुन हातावर गोळे लावले जायचे. नंतर पावडर आणून, पंच्यातून चाळून, सगळे सोपस्कार करून पेस्ट तयार होऊ लागली. मग ती चांगली रंगावी म्हणून प्रचंड प्रयोग!!

विषय: 
शब्दखुणा: 

मेंदीचा दरवळ

Submitted by मितान on 24 August, 2010 - 08:43

मागच्या आठवड्यात कोणाला तरी मेंदीची आठवण आली. आणि मग राखी पौर्णिमेला मेंदी काढूया असे ठरले. इथे पाकिस्तानी दुकानात मेंदीचे तयार कोन मिळतात. पण त्यात कोणतीकोणती रसायने मिसळली असतात म्हणे. मग काय कोन पण आपणच करूया असे ठरवले. कोणीतरी भारतातली मेंदी शोधून आणली. मोठ्या उत्साहात एका पातळ कपड्याने मेंदी चाळली. मग ती पाणी आणि निलगिरी तेल घालून लोण्याएवढी पातळ भिजविली. कात्री, प्लास्टिकचे पेपर, चिकटपट्ट्या यांचा एवढामोठ्ठा पसारा करत कसेबसे ४ धड कोन तयार केले. त्यात मेंदी भरली. नि वर रबर लावून ते बंद केले. सगळ्या घरभर मेंदीचा वास, निलगिरी तेलाचा वास घमघमत होता. मन भरून तो वास घेतला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मेंदी