जी

पहिल्य फिलिप कोटलर पुरस्काराबद्दल आदर्णीय नरेंद्रजी मोदीजींचे अभिनंदन

Submitted by भरत. on 15 January, 2019 - 23:54

आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान आदर्णीय नरेंद्रजी मोदीजीं यांना पहिला वहिला Philip Kotler Presidential Award प्रदान करण्यात आला आहे. फिलिप कोटलर हे जगभरात मार्केटिंग गुरू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार आदर्णीय नरेंद्रजी मोदीजींना मिळावा याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला असेल. या आनंदात संक्रांतीचे तिळगूळ, पोंगल इ.इ. अधिकच गोड लागले असतील.
अवॉर्ड , अवॉर्डदाता यांबद्दल अधिक माहिती हाती येताच इथे नोंदवली जाईल.

बाप

Submitted by एस.जी. on 18 August, 2018 - 22:53

शेतक-याच्या जीवनावर आधारीत ही कविता

*बाप*

बाप राबतो राबतो
बाप कष्टतो खपतो
तरी कर्जाचा बोजा
त्याच्या डोईवरी वाढतो .

दरवेळी नवा डावं
स्वप्नांचा नवा गावं
दरवेळी तेच व्हावं
स्वप्न विखरोनी जावं

याहिवर्षी तेच झालं
पीक करपोनी गेलं
दुष्काळात स्वप्न त्याचं
हरपुनी गेलं

असा दुष्काळ पाहुनी
बाप खचला मनातूनी
हसे आम्हाकडं पाहुनी
पण रडतो गं आतूनी

बाप नाही गं घरात
बाप नाही गं दारात
हाती घेऊनी च-हाट
बाप गेला गं रागात

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जी