'वैनायक' वृत्त : वाचकांना आवाहन
आवाहन
मायबोलीच्या वाचकांपैकी ज्या कोणाला खाली दिलेल्या 'वैनायक' वृत्तातील कविता वाचनाच्या विशिष्ट पद्धतीची /पद्धतीबद्दल माहिती असेल त्यांनी येथे ती माहिती द्यावी अशी माझी विनंति आहे. अशी कांही पद्धत आहे याबद्दलचा संदर्भ असा-
" मूर्ति दुजी ती
(सावरकरांची निवडक कविता)
संपादक- डॉ. ना. ग. जोशी
व्हीनस प्रकाशन, पुणे
या जुन्या पुस्तकात खालील माहिती दिलेली आहे.
वैनायक वृत्त
काव्य प्रांतात त्यांचा एक प्रयोग सावरकरी विशेषांनी भरलेला आहे. तो म्हणजे 'वैनायक' वृत्ताची निर्मिती. कमला व गोमंतक(पूर्वार्ध) यासाठी त्यांनी त्याचा वापर केला.