लता स्वरपु ष्प ४: मौसम है आशिकाना
Submitted by अश्विनीमामी on 19 May, 2018 - 09:50
हे चौथे पुष्प लिहिताना महजबीन बानो अर्थात मीना कुमारी ह्यांची आठवण येते. दु:खांची राणी म्हणून गौरविलेली गेलेली ही गोड चेहर्याची व कवीमनाची प्रतिभावान अभिनेत्री फक्त वयाच्या अडतिसाव्या वर्शी वारली. नुकतीच तिची पुण्य तिथी झाली. जीवनकथा नेहमीसारखीच. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवायला ही सिनेमात कामे करू लागली. बैजू बावराच्याही आधी ऐन सोळाव्या वर्शी तिने अलाउद्दीन मध्ये एका गोड व हसर्या राज कन्येचीही भूमिका केली आहे. हा सिनेमा मी दूरदर्शन वर बघितला आहे. साधे ग्राफिक्स पण मजेशीर. व मीना एकदम नाजूक. क्युटी पाय.
विषय:
शब्दखुणा: