ऋतू

वैशाख

Submitted by पुरंदरे शशांक on 16 April, 2018 - 00:05

वैशाख

उन वैशाखाचे
कहारते भारी
पेटला वणवा
धपापते उरी

वैशाख कोरडा
रखरख सारी
ढाळिते हिरवी
पालवी चवरी

गंधित रुंजित
आम्रतरू वरी
अलि गुंजारव
गोड शिरशिरी

धगधग सारी
तापतसे भुई
शोधिती सावली
वृक्ष पायातळी

खस चंदनाची
चढाओढ भली
शांतवोनी तृषा
विसरे काहिली

मोगरा धुंदीत
मारवा अस्ताई
तिन्हीसांज दारी
कातरशी होई

निष्ठुर निर्दय
वैशाख विखारी
खुणावी हासून
मेघ उभे दारी...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ऋतू