व्यसन आणि स्वभावदोष, संबंध, कारणे आणि उपाय - डॉ. माधवी साळुंखे
Submitted by अतुल ठाकुर on 27 February, 2018 - 00:01
मुक्तांगण संशोधनासाठी केसस्टडी म्हणून निवडले आणि दर महिन्याला माधवसरांच्या ठाणे येथिल फॉलोअप ग्रुपला जायला लागलो. डॉ. माधवी साळुंखे यांना सर्वप्रथम तेथेच पाहिल्याचं आठवतंय. त्या दिवशी त्या डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत घेत होत्या. त्यानंतर दुसर्यावेळी त्या स्वतःच फॉलोअप ग्रुपमध्ये बोलण्यासाठी येणार होत्या. त्यादिवशी बसमधून उतरताना त्यांना अपघात झाला होता आणि हाताला खुप खरचटलं होतं. मिटींगच्या जागीच त्या औषध लावून घेत होत्या. त्या दिवशी कुठल्यातरी देवाचा सण असावा. आपसूकच त्या देवाला लोटांगण घातले गेले असे त्या विनोदाने म्हणाल्या. तेव्हाच त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोणाचे दर्शन घडले होते.
विषय:
शब्दखुणा: