विडंबन

कधी वाटतं तसं व्हावं!

Submitted by टोकूरिका on 21 December, 2011 - 23:25

अमितची कविता http://www.maayboli.com/node/19785

@मितवा! पैलेइच सॉरी बोलरेली हय! Wink

कधी वाटतं तसं व्हावं......

अमावस्येची ढगाळ रात्र असावी....
आणि
ढीगभर पसरलेल्या
उकिरड्यावरच्या कचर्‍यातल्या
ओल्या पिशव्या तुडवित
असंख्या ठिगळांचा
अंगरखा घालून
चहाच्या बशीखालची
ती काळी कटोरी
ओंजळीत घेऊन
तू यावीस......

गुलमोहर: 

पाक कौशल्यातली तू दाखवी वळवळ इथे

Submitted by कौतुक शिरोडकर on 17 December, 2011 - 12:11

(आमची प्रेरणा... www.maayboli.com/node/31190
या पिढीच्या महान गझलकाराची जाहीर माफी मागून)

पाक कौशल्यातली तू दाखवी वळवळ इथे
तेल आहे तापलेले, फ्राय कर, तळ तळ इथे

तू वडे करशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी चकलीमुळेही कळ इथे

बघ तुझे पक्वान (?) कसल्याश्या सुवासे गंधती
अन मला भंडावतो करपा वरी दरवळ इथे

मी गिनीपिग नेहमी जेवावया गप बैसतो
'व्यक्त हो' केव्हातरी माझी मुकी हळहळ इथे

वाट किचनाची स्मशानालाच जाते शेवटी
ते वळण येईल आपोआप सध्या 'जळ' इथे

मी कढी वा सार चाखत, पुटपुटत भंजाळतो
'येथ मीठागर असावे... सागरी खळबळ इथे'

फक्त तेव्हा भात होतो भात म्हणण्यासारखा

गुलमोहर: 

जाहल्या काही चुका !

Submitted by A M I T on 14 December, 2011 - 04:24

जाहल्या काही चुका अन् दूर काही वाजले
तू दिलेले ते पराठे सवडीने चावले

बायकोच्या घोरण्यातच रात्र सारी संपली
पहाटे अंगावरी मग बादलीही ओतली
मी फटीतून चादरीच्या जुलूम सारे पाहीले

घर माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या यातना
रंग भाळावर निळे अन् जीवघेण्या वेदना
तू असे का लाटण्याने कपाळ माझे भेदीले?

संपता पगार माझा, सांग तू चिडशील का?
घेतली ना पैठणी जर, सांग तू रूसशील का?
हट्ट सारे पुरवण्या मी घाम माझे गाळले

* * *

मुळ गीत इथे पहा.

गुलमोहर: 

माय(बोली) प्रतिज्ञा

Submitted by बागुलबुवा on 6 December, 2011 - 23:23

मायबोली गीत व मायबोली व्हिडीयो वरुन प्रेरणा घेउन आपण एक मायबोली प्रतिज्ञा का बनवू नये बरे ?

मायबोली माझी(च) साईट आहे.
सारे मायबोलीकर माझे मित्र व माझे शत्रू यात विभागले गेले आहेत. म्हणजेच जे माझे मित्र नाहीत, उघड आहे की ते माझे शत्रू आहेत. माझ्या मतांना विरोध करणारे मूर्ख आहेत. माझी मते न समजणारे वा त्यांची टवाळी करणारे अतिशहाणे आहेत.

माझ्या लेखनातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मतांचा मला (दुरा)भिमान आहे.
त्या मतांचा आदर करण्याची पात्रता इतरांच्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

गुलमोहर: 

देशाची तिजोरी

Submitted by शाबुत on 6 December, 2011 - 03:53

देशाचीच तिजोरी, जनतेचाच ठेवा।
खा तुम्ही मेवा आता, खा तुम्ही मेवा॥ धु॥

दारी आमच्या एकदाच, पाच वर्षांनी येता
सभा घेऊनी तुम्ही मारता, मोठ्या-मोठ्या बाता
जाहीरनामा निवडनुकीचा, नंतर खोटा का ठरावा ॥१॥

गरीब जनता रात्र-दिवस, करीतात कष्ट
तरी त्यांना खाण्यामिळते, उरलेले-उष्ट
हरामाचे खाऊन तुम्ही, शिरजोर का ठरावा ॥२॥

जनतेला लुटण्याचाच, करार तुम्ही केला
नोकरदार वर्ग झाला, महागाईने अर्धमेला
धोरणं ठरवुन श्रीमंताचाच, फायदा का करावा ॥३॥

गरीबांच्या गरजांचा कधी, विचार नाही केला
पिण्यास नाही पाणी, त्यांना देणार कोका-कोला
झोपडीत आला तो, झोपडीतच का मरावा ॥४॥

गुलमोहर: 

धुंदी

Submitted by वर्षा_म on 2 December, 2011 - 00:24

विदिपांची क्षमा मागुन
http://www.maayboli.com/node/30924

============================

ढोसताना यापुढे सीमा ठेवायची आहे
एकदा झिंगायची संधी तुलाही द्यायची आहे

भरला जातोच जास्तीचा ग्लास ती चढते तेव्हा
अंतरी इच्छा भले दोनच खंबे रिचवायची आहे

दे उधळुन या सभ्य-शाली नी फुटकळ तोरा
बेधुंद आयुष्य ही मोठी दिक्षा घ्यायची आहे

प्रतिष्ठा खोटी हवी आहे तुला मी जाणले नाही
जीवनाची खरी मजा तूला उमजायची आहे

गुलमोहर: 

(सुख्याची गोष्ट) मुक्त बडबड (विडंबन)

Submitted by राज जैन on 29 November, 2011 - 12:54

कंगाल झालो आज मी
दारूचे पॅग भरता भरता
निर्धन झालो आज मी
चकणा-अन्-सोडा घेता घेता

नीट घेतले, सोड्यातून टेस्टले
तरी चढेना पीता पीता
रम घेतली, विस्की घेतली
किसे रिकामे विकत घेता घेता

व्होडक्यावर भागवले, चकणे सोडले
अपेक्षा चढण्याची ठेवता ठेवता
वाईन धरली, टकीला भरले
नाकीनऊ आले ती चढता चढता

कॉकटेल पाहिले, ऑन-द-रॉक्स झाले
गोल्डन थेंब उदरी घेता घेता
भाग्य रुसके, नशीब फुटके
चढेना वारुणी चखता चखता

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

परवा रजाच आहे

Submitted by A M I T on 23 November, 2011 - 01:36

टोकूला कुणाची पर्वा नाही. पण आमचा परवा कसा जाईल? याचीच आम्हांला पर्वा आहे.

हा ढीग आज रद्दीचा, काढला कशास आहे?
जाईन तो विकाया, परवा रजाच आहे

वाढतात केस का हे? वैताग नुसता आहे
येवोत कानाशी जरी, परवा रजाच आहे

आज तू म्हणालीस, परवा पिच्चरला जाऊ
येईल तो टिव्हीवर, घाई कशास आहे?

जमतील यार तीन, म्हणतील सोय काये?
उद्या रात्रभर ढोसू, परवा रजाच आहे

ज्युलीसोबत परवा, कॉफी निदान घेवू
अन् आज तू म्हणालीस, आई येणार आहे..!!

* * *

गुलमोहर: 

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे -

Submitted by विदेश on 20 November, 2011 - 00:26

(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे)

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे
पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ||

रंगविले गॅरेजात कितिक देखणे
आवडले गाडीला खूप खर्चणे
स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१|

हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा
गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा
वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२|

...पाहु दे असेच तिला आता गंजता
राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता
महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|

गुलमोहर: 

'बापु' खिशातले मग माझ्या पसार झाले - (हजल)

Submitted by A M I T on 10 November, 2011 - 05:04

उमेशभाऊंच्या गार झालेल्या सांबाराकडे पाहून आम्हाला आमच्या कुटूंबाची याद अनावर झाली.

असेच मी बोललो तरी वाद फ़ार झाले
रात्रीच्या जेवणात कालवण खार झाले

ध्यानी प्रकार आला, रात्रीच्या जेवणाचा
पिंपात आज ओल्या, उंदीर ठार झाले

पोटात अन्न नाही, आज दिन चार झाले
शहरातले उडीपी परवरदिगार झाले

वाढले बघा शरीर, हिचे किलो किलोने !
वजनकाट्याच्या डोई, उगा भार झाले

लढावया हीच खिंड राखून प्राण आहे
पहा लाटण्याचे पक्के मागून वार झाले

घेवून काल गेली, मज साड्यांच्या दूकानी
'बापु' खिशातले मग माझ्या पसार झाले

* * *

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन