Submitted by राज जैन on 29 November, 2011 - 12:54
कंगाल झालो आज मी
दारूचे पॅग भरता भरता
निर्धन झालो आज मी
चकणा-अन्-सोडा घेता घेता
नीट घेतले, सोड्यातून टेस्टले
तरी चढेना पीता पीता
रम घेतली, विस्की घेतली
किसे रिकामे विकत घेता घेता
व्होडक्यावर भागवले, चकणे सोडले
अपेक्षा चढण्याची ठेवता ठेवता
वाईन धरली, टकीला भरले
नाकीनऊ आले ती चढता चढता
कॉकटेल पाहिले, ऑन-द-रॉक्स झाले
गोल्डन थेंब उदरी घेता घेता
भाग्य रुसके, नशीब फुटके
चढेना वारुणी चखता चखता
वाटते आता, नुस्ताच पेप्सी छान होता
आपला खर्च कमी होता
दारूचा खर्च आणि चकण्याचे बील
मायला, सुखी माणसाचा सदरा माझ्याकडेच होता....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वाटते आता, नुस्ताच पेप्सी छान
वाटते आता, नुस्ताच पेप्सी छान होता
आपला खर्च कमी होता
दारूचा खर्च आणि चकण्याचे बील
मायला, सुखी माणसाचा सदरा माझ्याकडेच होता....>>>>.
सदरा धुऊन घालत जा रोजच्या रोज,नाहितर दारुचा वास येईल त्याला(सोडली नसेल तर) .
नीट घेतले, सोड्यातून
नीट घेतले, सोड्यातून टेस्टले
तरी चढेना पीता पीता
रम घेतली, विस्की घेतली
किसे रिकामे विकत घेता घेता>>>>
दीव दमनची असनार.