विठू अनुभव
Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2018 - 01:39
विठू अनुभव
कंठात तुलसी । भाळी तळपती । चंदनाची उटी । विठ्ठलाच्या ।।
कटेवरी हात । खुणावितो भक्ता । भवाब्धि (भवसागर) इतुका । तुम्हालागी (भक्तांलागी ) ।।
परब्रह्म स्वये । जाहले सगुण । गुण विलक्षण । वर्णवेना ।।
संत गाती नित्य । जयाची महती । रखुमाई पती । ध्यानी मनी ।।
येका शुद्ध भावे । येताची शरण । देई प्रेमखूण । निज भक्ता ।।
दीनांचा कैवारी । बंधू अनाथांचा । मायबाप साचा ( खरा) । लेकुरांचा ।।
पुरवितो कोड (लाड) । भक्तिचे भातुके (खाऊ, खाद्यपदार्थ) । गर्जे एकमुखे । संतजन ।।
शब्दखुणा: