डॉ. हिंमतराव बावस्कर

मी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्‌महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - डॉ. हिंमतराव बावस्कर