माझे मित्र श्री. गणेश शंकर चव्हाण यांनी नुकतीच 'कॉलनी फिल्म्स' प्रस्तुत 'जिव्हारी' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या २० मे २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्रात तसेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई आणि इंग्लंड मध्ये प्रदर्शित होत आहे. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असून चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.
हा चित्रपटाचा टीझर -
https://youtu.be/VSTcS3EfJVU
एका कैफात लिहिली होती
ती कविता
वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत?
मग काढून टाकले सर्व - उपमा, अनुप्रास, यमकं
साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली
तेव्हा
थोडी भुंडी पण बरीच खरीही वाटली
ती कविता
वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत?
मग कापलं सपासप -
वायफळ शब्दतण
तेव्हा
थोडी ओकीबोकी पण मघापेक्षा जास्तच खरी वाटली
ती कविता
वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ?
मग खोडायला गेलो दोन चार ओळी
तेव्हा
ओळीतल्या रिकाम्या जागेतून
सण्णकन फणा काढत
जिव्हारी डसली
ती कविता