एकजीव
Submitted by दत्तात्रय साळुंके on 17 December, 2017 - 02:43
एकजीव
एका हाताने दुसऱ्या हातात
हात गुंफावे
एका डोळ्याने दुसऱ्या डोळ्याची
नजर विस्तरावी
एक ओठाने दुसऱ्या ओठाचे
चुंबन घ्यावे
एका कानाने दुसऱ्या कानाचे
गीत ऐकावे
एका पायाने दुसऱ्या पायाचे
ओझे वहावे
एका हृदयाने दुसऱ्या हृदयाची
सल जाणावी
एक मनाने दुसऱ्या मनाला
टाळी द्यावी
एका जीवाने दुसऱ्या जीवाशी
एकजीव व्हावे
दत्तात्रय साळुंके
विषय: