आज लाईट गेली ...
आज लाईट गेली. मुंबई अंधारात गेली. सकाळी उठल्या उठल्याच ही अशुभवार्ता समजली. सकाळ असल्याने अंधार जाणवला नाही. पुरेसा वारा वाहत असल्याने उकाड्यानेही हैराण केले नाही.
गीझर नसल्याने आंघोळीची गोळी घेतली आणि दिवसाची सुरुवात चांगली झाली. वर्क फ्रॉम होमच करायचे होते. लॅपटॉप शंभर टक्के चार्ज होता. पण मोजून साडेतीन तास काम केले आणि लॅपटॉप मेला डिक्लेअर केले. हाफ डे सुट्टी टाकून मोकळा झालो.
स्वयंपाकघरातील वाफा टाळायला जेवण बाहेरूनच मागवले. जेवण झाल्यावर हलकीशी डुलकी घेतली. आणि जरा उन्हं खाली सरकताच मुलांना घेऊन खाली गार्डनमध्ये खेळायला गेलो.