नविन चित्रे
माझ्या मुलीने तिच्या शाळेच्या मासिकासाठी काढलेली चित्रे खाली देत आहे (खर तर इतक्या सुंदर चित्रांच्या विभागात लहान मुलीची चित्रं अपलोड करणे कसतरी वाटत पण बालविभाग नसल्यामुळे पर्याय नाही.) माझ्या मुलीचं वय ७ वर्ष ९ महिने. तिने पहिल्यांदाच कॉपी करुन चित्र काढलं आहे म्हणुन मला जाणकारांची मतं हवी आहेत.तिला असे कॉपी करायला द्याव का ? तिचा हात साफ व्हावा ह्यासाठी काय करता येईल? तिला अजुन कोणत्याही चित्रकलेच्या क्लासला घातलेले नाही आहे तर अशा क्लासची खरच गरज असते का?