दुसरी बाजू
तसं म्हटलं तर एव्हाना ’गे’, ’लेसबियन’ हे शब्द अंगवळणी पडलेले शब्द झाले आहेत. समलिंगी विवाह तर कायद्याने मान्य झाला आहे. पण खरंच सर्वत्र आबादीआबाद आहे का? समलिंगत्वाचं वर्गीकरण सामान्य माणसांकडून दोन वर्गात केलं जातं. स्वाभाविक आणि विकृत. सर्वच देशात याबाबत मतभिन्नता आहे. पण आपल्याच घरात समलिंगी माणूस असेल तर? आणि तेही यौवनावस्थेत पदार्पण करीत असलेलं? जिथे व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य आहे अशा अमेरिकेतही समाजाचा, मित्रमैत्रिणींचा, नातेवाईकांचा आणि मुख्यत्वे दबाब असतो तो चर्चमधील सहाध्यायींचा.