विनोदी लेखन
सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...
हा लेख माझा मित्र अमित पवार ने लिहिला आहे.
त्याच्या 'असाच काहीतरी...' ह्या ब्लोग वरून हा लेख पोस्त केला आहे.
अमित पवार च्या ब्लोग ची लिंक - http://amitpawar21.blogspot.com/
सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...
परवा पुलंच मी मुंबईकर, पुणेकर आणि नागपुरकर ऐकत होतो.. राहुन राहुन मला माझ्या कॉलेजची आठवण झाली.. सांगलीच्या आमच्या वालचंद कॉलेजमध्ये असेच ढोबळमानाने वेगळे काढता येण्यासारखे तीन ग्रुप होते..
सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...
आजचा दरबार ... श्रावण वर्सेस रोझा
प्रधानजी - महाराजांचा ... आं, महाराज, काय झालं. चेहरा कडवट करुन का बसलायत ? जवळचं आणि लांबचे दोन्ही खपले की काय ?
महाराज - प्रधानजी ..
प्रधानजी - नाही म्हणजे झालं काय ? व्हॉटस् द मॅटर ...
महाराज - काही नाही रे. तुझ्या महाराणीने
प्रधानजी - काय केलं महाराणीने .. थांबा आत्ता जाऊन तिला खडसावतो. नको, त्याच्या नादाला
लागायची सवयच झालेय तिला. तुम्ही थांबा मी राणीला आत्ता जाब विचारून येतो.
महाराज - हूं ... वाटलचं ... तुम्ही नेहमी चान्स बघत असता ... महाराणींना भेटायला. मला म्हणायचयं आमच्या महाराणींनी आम्हाला श्रावण पाळायला सांगितला.
प्रधानजी - महाराज तुम्ही श्रावण पाळलाय.
अख्तर कॉलिंग अख्तर
सध्या फरहान अखतरवरून चाललेल्या माबो धुमश्चक्रीला स्मरून आणि एफएमच्या ९२.७ च्या कल्पनेला धरून
अख्तर कॉलिंग अख्तर :
फरहान (आपल्या प्रचंड घोगर्या आवाजात) :
पापा, देखिये ना, ये मायबोलीकर्स मुझे कितना क्रिटिसाईज कर रहे है. एक तरफ मेरा फॅन क्लब निकाला है और एक तरफ मेरी फिल्म्स को "प्रेडिक्टेबल" केहेते है.... मुझे कुछ समझ मे नही आ रहा.... पापा.
जावेद (शेरोशायरी मोड ऑन) :
बेटा, इसपर मुझे मेरीही कुछ पंक्तीयां याद आती है..... जरा गौर करना.
बिगडे दुनिया बिगडने भी दो, झगडे दुनिया झगड ने भी दो,
बेडरेस्ट
वावरात काम करता करता बुडी एकदम चक्कर येऊन पडली. तसा तिच्या भोवती बायांचा घोळका जमा
झाला. एव्हाण कोणीतरी बातमी बुडीचा पोरगा दादुच्या कानावर घातली. तसा दादु पळतच वावरावर
पोहोचला. बुडीचा श्वास तेवढा वर-खाली होत होता. दादुन लगेच बुडीला बैलगाडीत टाकले आणि सऱळ
गावाकडच्या डॉक्टर कडे निघाला. सोबत शेतातल्याच २ बाया घेतल्या. बैलगाडी दवाखान्यापाशी
पोहोचली तसा बूडीचा श्वास मंद झाला. डॉक्टरनी तडक बुडीला शहराकडे न्यायला सांगीतले. तसा दादुही
घाबरला होता. कसाबसा डॉक्टरकडे पोहोचला. पोहोचल्यावर डॉक्टरनी तपासणी केली. काही टेस्ट
सांगीतल्या
पिंटू आणि पिंकी ... (१)
आजचा दरबार प्रमाणेच एक नवं सदर मी सुरू करतोय. पिंटू आणि पिंकी.
पिंकी - ये पिंटू.
पिंटू - काय गं, पिंकी
पिंकी - अरे दोन दिवसांनी श्रावण सुरु होणार ना.
पिंटू - मग
पिंकी - मग काय ? आता एक महिना मटण, चिकन, मच्छी सगळं बंद.
पिंटू - मग बरचं झालं की
पिंकी - काय बरं झालं. आमचा टॉमी काय खाईल.
पिंटू - अरे हो. मग आता.
पिंकी - काय करावं तेच कळत नाहीए. चपाती-भाजी, भात-डाळ असलं तो खात नाही. वास असेल तर घास असं आहे रे त्याचं.
पिंटू - मग आता .... तू टॉमीला पण श्रावण करायला लावणार.
जीवाचे मौन
"आमच्या मंडळात एक भगिनी आल्या होत्या काल! त्यांनी मौनाचे महत्व सांगितले. प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस मौन करावे असे त्यांनी सांगितलेले आहे. तेव्हा मी आज दहा वाजल्यापासून मौन करणार आहे"
वामनरावांना खरे तर हे ऐकून शाळकरी मुलीसारखी एक गिरकी घेऊन टाळ्या वाजवत सोसायटीभर नाचत सुटावेसे वाटत होते. पण 'निखळ आनंद' व्यक्त करण्यास त्यांच्या घराच्या घटनेत तरतुद नव्हती. छद्मी किंवा आसुरी आनंद असल्यास ते चालायचे, पण तोही लतिकाबाई एकट्याच व्यक्त करणार असा नियम होता. आणि घरची घटना लतिकाबाईंच्या एकसदस्यीय समितीने निर्माण केल्यामुळे घटना दुरुस्तीही करता येत नव्हती.
अबब अमेरिका
(लहानपणी मावसभावाकडे सोवियत रशियाचा कुठलातरी अंक यायचा त्यावरुन आम्ही अमेरिका कशी आहे ते ठरवायचो :-). त्या अमेरिकेत पंधरा वर्षापूर्वी पाऊल ठेवलं तेव्हा असलेल्या आमच्या अज्ञानाचा हा मजेशीर आलेख. आताच्या सारखं अद्यायावत माहितीच्या आधारे 'आलो की झालो इथलेच' पेक्षा फार वेगळा काळ होता तो हे लक्षात घेऊन वाचावे.)
"प्लीज कॉम्प्रमाईज विथ देम"
भावना व्यक्तीकरण कर्मचारी पुरवठा केंद्र
८० वर्षांची म्हातारी मेली तसा दादू वैतागला. शेजारपाजारची चार माणसे आली होती आणि त्यांना म्हातारीला एकदाचे स्मशानात नेऊन टाकायचे होते. इव्हन दादूलाही काही विशेष इन्टरेस्ट नव्हताच. पण तो बघायचा. रस्त्यावर कित्येक कट आऊट्स असायचे. कुणाचा वाढदिवस, कुणाची कुठेतरी निवड झाल्याबद्दल अभिनंदन तर कुणाचे तरी दु:खद निधन! दादूला स्वतःचा वाढदिवस माहीत नसल्याने त्याला हेही माहीत होते की त्याचे होर्डिंग कधीच लागणार नाही. पण निदान म्हातारी वारली आहे तर त्याचा तरी उल्लेख केला जावा ही त्याची प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे तो विचार करत बसला होता.
ह्या लाजीरवाण्या घरात..! - ४
Pages
