कोरांटी :- भाग 1
स्मिता! तिचं नाव! नावाप्रमाणेच सतत आनंदी रहाणारी. खरंतर अतिशय गरीब घरात जन्म झालेला तिचा. अतिशय हलाखीची परिस्थिती. वडिल एका खेडेवजा गावात साधे टेलर आणि आई गृहिणी. पाठचे दोन लहान भाऊ. आई घरीच शिवणकाम करून चार पैसे मिळवायची. घरांत कोंबड्याही पाळलेल्या. दुसरे काही उत्पन्नाचे साधन नाही. आता ही जन्मतःच बाळसेदार होती. गोरीपान आणि अतिशय रेखीव डोळे असलेली. पण पहिलीच मुलगी झाली, त्यामुळे वरवर नुसते लोकांना दाखवायला आईबापांनी खूशी जाहीर केली. पण मनात तिच्याबद्दल अढी पुढे कायमच राहिली. आता त्या चिमुकलीला याचा गंधही नव्हता. लहान मुले आपल्या आईवडिलांबरोबर कोणत्याही परिस्थितीत खूशच असतात.