फळविक्रेत्या शेवंताबाई
Submitted by Akshar on 1 August, 2017 - 20:57
आजच सकाळी आमच्या फळविक्रेत्या शेवंताबाईनी (नाव बदलले आहे) आपला एक स्वानुभव सांगितला.
शेवंता बाईचे लग्न फार लहानपणी झाले होते. ४ बाळंतपणे होऊन ४ मुली झाल्या होत्या. पाचव्या बाळंतपणात मुलगा झाला तरच घरी परत ये म्हणून सासरच्या लोकांनी तिला ३ऱ्या महिन्यातच माहेरी पाठवले होते. शेवंता बाई फारच चिंतीत होत्या. दर संध्याकाळी दत्तगुरूंच्या मंदिरात त्या भजनाला जाऊन बसत आणि रात्री इतर बायका बरोबर चालत घरी येत. घर कोंकणात होते त्यामुळे वाटेवर नारळ आणि काजूची झाडे लागत असत.
शब्दखुणा: