तेंव्हाही... आताही
Submitted by डॉ अशोक on 6 June, 2017 - 21:54
तेंव्हाही... आताही
*------------------*
तू होतीस तशीच आहे,तेंव्हाही... आताही
पाठीशी माझ्या अशी, तेंव्हाही... आताही
*
वर्षे सरली किती, अजून कळले नाही
अंतर नाही आले, तेंव्हाही... आताही
*
कितीक श्रावण आले, भिजवून आणिक गेले
ग्रीष्मातही भिजलो आपण, तेंव्हाही... आताही
*
तू खळाळून हंसली, मीही स्मित केले
मौनातही सारे कळले, तेंव्हाही... आताही
*
रदीफ होती नव्हती, पर्वा कुणास आहे?
तू एक गझल माझी, तेंव्हाही... आताही
*
-अशोक
(ह्या गीताची ध्वनीफीत मागणी केल्यास मिळेल)