एका कळीचे मन
फुलाला फुलतांना कळीने पाहिले
मोहरलि ती अंतरी काय बरे गवसले
आभाळाच्या आरश्यात प्रतिबिंब पाहतांना
आपल्याच नादात वाऱ्यासंगे डोलतांना
फुलाचे बहरणे, वाऱ्यावर डोलणे
पाखरांचे पाकळ्यांशी गुंजन करणे
आतुर कळीने फुलमस्त पाहिले
आपलेहि वाऱ्यासंगे डोलणे स्वप्निले
परंतु संध्यासमयी फुलाचि एक पाकळी
वाऱ्यासंगे जाऊन दूर उडाली
वाटली हळहळ कळीला त्या पाकळीसाठी
तरिहि मनी मोहरे नादात ती वेडी
हळुहळु फुलाची पाकळी पाकळी
दूरदेशी जाऊन शांततेत निमालि
कळीचे मोहरणे तेथेच थांबले
हादरली कळी पाहुन फुलाचे धिंडवडे