व्यक्तीचित्रण - श्रीनगर काश्मिर- डाल सरोवर.
Submitted by कांदापोहे on 13 April, 2017 - 02:43
मार्च संपता संपता काश्मिरमधे एक आठवडा फिरुन आलो. संपुर्ण प्रवासात श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग व सोनमर्ग येते जाऊन आलो.
२ दिवस हाऊसबोटमधे राहिले असताना व्हेनीस किंवा थायलंडप्रमाणे इथेही पाण्यावर एक मार्केट उभे आहे व तुम्ही शिकारा घेतला व फिरलात की पाण-फिरते विक्रेते येत रहातात. अशाच काही विक्रेत्यांची प्रकाशचित्रे सादर करत आहे.
दल सरोवरामधल्या हाऊसबोटमधे जाण्याकरता छोट्या बोटींचा वापर अनिवार्य आहे. तुमचे बुकिंग असलेल्या हाऊसबोटमधे सोडण्याकरता अशा शिकार्यांचा किंवा बोटींचा वापर करावा लागतो.
विषय: