मार्च संपता संपता काश्मिरमधे एक आठवडा फिरुन आलो. संपुर्ण प्रवासात श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग व सोनमर्ग येते जाऊन आलो.
२ दिवस हाऊसबोटमधे राहिले असताना व्हेनीस किंवा थायलंडप्रमाणे इथेही पाण्यावर एक मार्केट उभे आहे व तुम्ही शिकारा घेतला व फिरलात की पाण-फिरते विक्रेते येत रहातात. अशाच काही विक्रेत्यांची प्रकाशचित्रे सादर करत आहे.
दल सरोवरामधल्या हाऊसबोटमधे जाण्याकरता छोट्या बोटींचा वापर अनिवार्य आहे. तुमचे बुकिंग असलेल्या हाऊसबोटमधे सोडण्याकरता अशा शिकार्यांचा किंवा बोटींचा वापर करावा लागतो.
आमचा शिकारा चालक
मच्छीमार व्यावसायीक. आमच्या शिकाराचालकाने माहीती दिली की यांचे घर कुटुंब व संपुर्ण जीवन या बोटीवरच होते. बोटीतुन ते मासेमारी करतात, झोपतात, स्वयंपाक बनवतात.
फुलविक्रेता. फुलांसोबत याच्याकडे अनेक शोभेच्या फुलझाडांच्या बिया, ट्युलीपचे कांदे वगैरे विक्रीकरता होते.
दल सरोवरात रहाणारे विक्रेते त्यांची कुटुंबे यांना लहानपणापासुनच बोट वल्हवणे शिकवले जाते. ही चिमुरडी अशीच आपल्या आईसोबत भाजी आणायला निघाली होती.
हा फळविक्रेता शेजारच्या हाऊसबोटखाली पाऊस पडायला लागल्यावर आश्रयाला आला होता.
हा दुसरा मनमौजी फळविक्रेता. अतिशय प्रसन्न हास्य होते त्याच्या चेहर्यावर.
याच सरोवरामधे लाकडी कोरीवकाम केलेल्या वस्तुविक्रेते, केशर विक्रेते, काश्मिरी कापड, शाली वगैरे विक्रेते सुध्दा फिरत होते.
वाह मस्त फोटोज आणि माहिती.
वाह मस्त फोटोज आणि माहिती.
वर्णन थोड कमी पडलं पण चालसे.
वर्णन थोड कमी पडलं पण>> मला
वर्णन थोड कमी पडलं पण>> मला ते मुलामे द्यायला जमतच नाही रे. लेखनाची बोंब आमच्या. :)धन्यवाद!!
छान फोटो रे केप्या!
छान फोटो रे केप्या!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो केपी.
मस्त फोटो केपी.
ट्युलिपचा हंगाम होता पंधरा
ट्युलिपचा हंगाम होता पंधरा दिवसांपुर्वी. पक्षांचे सुंदर फोटो ( विशेष लकबीसह) टिपणारा हाच का तो फोटोग्राफर? असं म्हणतो कारण अपेक्षा वाढल्या आहेत. (२८एमेम प्राइम लेन्झ!)
सुंदर!!
सुंदर!!
केपी, भारीच!
केपी, भारीच!
सगळेच एक नंबर!
तो एक शिकारा तुझ्या नावाचाच होता वाटते!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ट्युलिपचा हंगाम होता पंधरा
ट्युलिपचा हंगाम होता पंधरा दिवसांपुर्वी>> तेव्हाच होतो मी श्रीनगर मधे. कमिंग सुन.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पक्षांचे सुंदर फोटो ( विशेष
पक्षांचे सुंदर फोटो ( विशेष लकबीसह) टिपणारा हाच का तो फोटोग्राफर?>>>
म्हणजे! हे काय विचारणं झालं?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा गळ्यात कॅमेरा अडकवून आला की सगळी पाखरं ह्याला 'पोज' देतात असे वाटते ह्याने काढलेले फोटो पाहून!
मस्तच केपी..
मस्तच केपी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो. आम्ही लेहला
मस्त फोटो. आम्ही लेहला गेलेलो तेव्हा श्रीनगर स्टॉपमध्ये दाल लेक फेरी मारलेली.
वाह!
वाह!
वा केपी! ते पहिल्या फोटोतलं
वा केपी! ते पहिल्या फोटोतलं कलर कॉम्बिनेशनच जबरा. तिथपासून जी पकड घेतली फोटोजनी ती शेवटपर्यंत सोडलेली नाही. मायक्रो, पक्षी, पोर्ट्रेट, सगळ्यातच एक्स्पर्ट रे!
मस्त!
मस्त!
मला ते मुलामे द्यायला जमतच
मला ते मुलामे द्यायला जमतच नाही रे. लेखनाची बोंब आमच्या. :)धन्यवाद!! >>
अरे मग अजुन फोटोच टाकायचेस की नुसते ....
अप्रतिम आहेत पण फोटो सगळे.
कांदापोहे, जरा भारी फोटो हवेत
कांदापोहे, जरा भारी फोटो हवेत तुमच्याकडून.
लेखनाची बोंब आमच्या >>>>>>>>>
लेखनाची बोंब आमच्या >>>>>>>>> शिकला असतास शाळेत व्यवस्थित तर ???![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण असो. फोटोज मस्त आहेत.
अरुण
अरुण![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
केपी त्या तुझ्या शिकार्यात गुलाबाची फुलं पसरलीत का रे ?
केप्या, फक्त शिकारे आणि
केप्या, फक्त शिकारे आणि हाउसबोटींच्या फोटोजवर प्रतिक्रीया मिळणार नाही माझ्याकडून. बाकी फोटोजपण येऊदे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केप्या मस्त आहेत फोटो.
केप्या मस्त आहेत फोटो.
धन्यावाद लोकहो. भाचा कसचं
धन्यावाद लोकहो.
भाचा कसचं कसचं.
शिकला असतास शाळेत व्यवस्थित तर ???>>
खरच रे.
दक्षे\रमड कमिंग सुन. ट्युलिप फेस्टीवल व सगळीकडे नुसता बरफ बरफ वाले फोटु येतील.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
SRD येतील येतील. ढगाळ हवा व मोबाईल्+कॅमेरा असे फोटो त्यात मोबाईलवरुन वॉटरमार्क टाकताना खराब झालेले फोटो यामुळे मलाही फार मजा आली नाही.
धन्यवाद.
केपी त्या तुझ्या शिकार्यात
केपी त्या तुझ्या शिकार्यात गुलाबाची फुलं पसरलीत का रे ?>> नाही रे. कापड आहे.
सुंदर फोटो..
सुंदर फोटो.. काश्मीर पुन्हा एकदा पाहावेसे वाटत आहे.. पण
तिथे चाललेल्या disturbance च्या बातम्या पाहून हो नको
होत असतं..
कानात काश्मीर की कली ची गाणी
कानात काश्मीर की कली ची गाणी वाजू लागली आहेत . कोणत्याही क्षणी शम्म्या प्रवेश करील असे वाटत राहते
छान फोटो......
छान फोटो......
काही खरेदी वगैरे? )
(मग माझ्याकरता तिकडची काहि चिल्लर आणलिस की नाही?
चिल्लर हवी असल्यास श्रीनगरात
चिल्लर हवी असल्यास श्रीनगरात रस्त्याच्या कडेला अंधेको पैसा दे दे बाबा म्हणत बसावे. मोप पाकिस्तानी नाणी मिळतील
छान आलेत फोटो!
छान आलेत फोटो!
आधी काश्मीर मध्ये व्यक्तीचित्रण म्हणजे काय असा प्रश्नच पडला होता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम.
अप्रतिम.
कोणत्याही क्षणी शम्म्या
कोणत्याही क्षणी शम्म्या प्रवेश करील असे वाटत राहते>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यावाद लोक्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोणत्याही क्षणी शम्म्या
कोणत्याही क्षणी शम्म्या प्रवेश करील असे वाटत राहते>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान टिपलेस फोटो. ३रा आणि शेवटचा आवडले.